Skip Navigation Links



ओबामा - २००८ ते २०१२

Author : Raj      Blog :Random Thoughts      Date: 9/8/2012 1:53:00 PM


२००८ मध्ये ओबामा निवडून आल्यानंतर त्यांनी केलेलं भाषण प्रभावी होतं. यात ते उत्कृष्ट वक्ते आहेत हा भाग होताच, शिवाय ज्या परिस्थितीमध्ये ते निवडून आले त्याचाही मोठा वाटा होता.  ज्या वंशाला समान हक्क मिळवण्यासाठी १९६४ पर्यंत वाट पाहावी लागली त्या वंशाचा प्रतिनिधी राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर जाणं हे अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत होतं. परिणामत: अपेक्षा भरपूर होत्या. खरं तर अमेरिकेची निवडणूक त्या राष्ट्राचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात बाकीच्या जगाला इतका रस असायचं कारण नाही. पण अमेरिका पूर्वीइतकी प्रबळ नसली तरी अजूनही दखल घेण्याइतकी 'सुपरपॉवर' नक्कीच आहे त्यामुळे दर चार वर्षांनी जगभरातील मिडिया इथं काय होतं आहे याकडे लक्ष ठेवून असतो. वैयक्तिक पातळीवर मला ओबामांच्या कारकीर्दीमध्ये माफक रस होता. अमेरिकेचे अंतर्गत प्रश्न ते कसे हाताळतात हे जाणून घेण्याचं फारसं कारणं नव्हतं. 'हेल्थ केअर'ने नक्की काय फरक पडेल याची माहिती घेण्यापेक्षा 'कोल-गेट'च्या मुळाशी जाणं अधिक सयुक्तिक होतं. अर्थात बजेटसारखा मोठा प्रश्न असेल तर घडामोडी आपसूक कळतातच. याशिवाय काही बाबतीत ओबामांचं धोरण कसं असेल याबद्दल उत्सुकता होती आणि अपेक्षाही होत्या. या बाबी जागतिक पातळीवर महत्त्वाच्या होत्या. साहजिकच ओबामांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन एकांगी आहे. अमेरिकेच्या अंतर्गत बाबींमध्ये त्यांची कामगिरी चांगली असेल, मात्र परराष्ट्र धोरण, पर्यावरण यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल त्यांनी निराश केलं आहे असं खेदाने म्हणावं लागतं.

ओबामा सत्तेवर आले तेव्हाचा काळ कसोटीचा होता. अर्थव्यवस्थेचा तेरावा घालून पिंडदान बुशसाहेबांनी स्वहस्ते केलं होतं. इराकमधली परिस्थिती हाताबाहेर गेली होती. ओबामांनी निवडणुकांच्या दरम्यान बरीच आश्वासनं दिली, दुर्दैवाने यातील बहुतेक कागदावरच राहिली. 'ग्वांटानामो बे'मधील बेकायदेशीर तुरुंग अजूनही चालू आहे. इराकमधलं युद्ध अखेर संपलं, पण अफगाणिस्तानमध्ये आणखी सैन्य पाठवण्यात आलं. हे सैन्य पाठवण्याचा निर्णय ओबामांनी ज्या आठवड्यात घेतला त्याच आठवड्यात त्यांना नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं.

'विकीलीक्स'ला मदत केल्याच्या आरोपाखाली ब्रॅडली मॅनिंगला बेमुदत एकान्तवासात ठेवण्यात आलं आहे, तिथे त्याचा छळ होतो आहे. शीतयुद्धाच्या काळात रशिया आणि इतर देशांच्या कारवाया उजेडात आणणाऱ्या अनेक लोकांना अमेरिकेने राजकीय आश्रय दिला होता, आता अमेरिकेपासून वाचवण्यासाठी असांजला इक्वाडोरने आश्रय दिला आहे. प्रशासनाच्या कारवाया उजेडात आणणाऱ्यांविरुद्ध ओबामा सरकारने मोहीम आखली आहे. 'वॉर ऑन व्हिसलब्लोअर्स' या नावाने ओळखली जाणारी ही मोहीम लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या सर्व संकेतांची पायमल्ली करते आहे. 'वॉर ऑन टेरर' या नावाने सुरू झालेली अविचारी मोहीम नजीकच्या भविष्यकाळात थांबेल अशी चिन्हं दिसत नाहीत. उलट सुरक्षिततेच्या नावाखाली मनमानी करण्याचं लायसन म्हणून त्याचा उपयोग केला जातो आहे. अतिरेक्यांपासून सुरक्षा हे धोरण बऱ्याच देशांच असतं पण यासाठी 'टीएसए' चे नवीन निर्बंध हास्यास्पद वाटावेत इतके कडक आहेत. सोपा-पिपा सारखे कायदे आणून आंतरजालावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होतो आहे. सुरक्षिततेच्या नावाखाली केल्या गेलेल्या बदलांमुळे झालेली आजची अमेरिकेतील परिस्थिती पाहिली तर शीतयुद्ध काळातील रशियाची आठवण होते. कम्युनिझमाखाली होणाऱ्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल गेली पन्नास वर्षे गळे काढणाऱ्या अमेरिकन राज्यकर्त्यांना आपण त्याच वाटेने जात आहोत हे जाणवत नसेल का? पुतिन त्याच्या विरोधकांना दडपतो आहेच, पण अमेरिकेत तरी वेगळं काय चाललं आहे?

'ड्रोन अटॅक्स'मध्ये जे निरपराध दररोज मारले जातात त्यांना अतिरेकी कारवाया का म्हणू नये असा प्रश्न नॉम चॉमस्कीसारख्या काही विचारवंतांनी उपस्थित केला आहे. पण बहुतेक वेळा अशा लोकांना डाव्या विचारसरणीचे लेबल लावून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. खरा मुद्दा असा आहे की इतर देशांमधील लोकांच्या आयुष्याचं मोल अमेरिकन नागरिकांच्या आयुष्यापुढे कस्पटासमान आहे. ही विचारसरणी आज तयार झालेली नाही, व्हिएटनामपासून चालू आहे. व्हिएटनाम, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, दक्षिण अमेरिकेतील अनेक राष्ट्रं - अशा देशांमधील अमेरिकन नागरिकत्व नसलेली माणसे मारणं म्हणजे अमेरिकेच्या दृष्टीने डास-चिलटं मारण्यासारखं आहे. व्हिएटनाम युद्धामध्ये अमेरिकेने जो रसायनांचा मारा केला त्याचे दुष्परिणाम अजूनही येणाऱ्या पिढ्या भोगत आहेत. (यस, वी कॅन?) रडत-खडत का होईना अमेरिकेने याची अंशतः जबाबदारी स्वीकारली आहे. अशा वेळेस मला अमिताभचं लावारिसमधलं गाणं आठवतं, "आप भी मेरी तरह इन्सान की औलाद है, आप मुहमांगी दुआ हम अनसुनी फरियाद है..अपना तो खून-पानी, जीना-मरना बेमानी.."

या पार्श्वभूमीवर नुकतंच झालेलं 'डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन' बघितलं तेव्हा फारसा प्रभाव पडला नाही. एक तर अशा अडचणीत आणणाऱ्या मुद्द्यांचा अशा वेळी कधीच विचार होत नाही. किंबहुना 'वॉर ऑन टेरर'चा अपवाद वगळला तर परराष्ट्र धोरण हा 'इलेक्शन-इश्यू' झाल्याचं आठवत नाही. कारण "इट्स द इकॉनॉमी, स्टुपिड" पासून ते हेल्थ केअरपर्यंत अनेक मुद्दे अमेरिकन जनतेला अधिक जिव्हाळ्याचे आहेत. ओबामा ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलताना पोटतिडिकीने बोलतात, पण क्योटो प्रोटोकॉलवर सही करायला तयार होत नाहीत. आजही बऱ्याच अमेरिकन लोकांची इराक युद्ध हे इराकमध्ये लोकशाही नांदावी या उदात्त हेतूने लढलं गेलं होतं अशी ठाम खात्री आहे. (जगभर लोकशाही नांदावी अशी कंड सुटली असेल तर चीन आणि उत्तर कोरियापासून सुरूवात का करत नाहीत? हून जाउदे समद्यांचा सुपडा साफ, जगलेवाचलेले हजार-दोनहजार लोक रानावनात शेकोट्या पेटवून सुखाने तरी जगतील.)

अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे हे एकांगी आहे. ओबामांनी चांगली कामंही केली आहेत. मोटार कंपन्यांना रूळावर आणणं, अर्थव्यवस्थेला किमान पायावर उभं करणं वगैरे. आणि इतके आक्षेप घेतल्यानंतरही जर मी अमेरिकन नागरिक असतो तर मत ओबामांनाच दिलं असतं. याचं कारण रिपब्लिकन पक्षाइतकी बथ्थड, मंद, दुराग्रही, अवसानघातकी, अविचारी जमात या पृथ्वीतलावर नाही. 'फॅक्ट-चेकिंग'सारखी क्षुल्लक बाब आम्हाला रोखू शकत नाही असं त्यांनीच कबूल केलं आहे. ते निवडून आले तर पहिलं काम काय करतील तर इराणमध्ये घुसतील. पेंटागॉनला नको असतानाही आणखी पैसे देण्याचं कलम त्यांच्या निवडणूक प्रचारामध्ये आहे. किमान ओबामा तसं करणार नाहीत अशी आशा आहे. (तरी सिरीया, येमेन प्रकरणांमध्ये ओबामांची भूमिका संदिग्ध आहेच.)

यामुळे मिशेल ओबामा, बिल क्लिंटन आणि खुद्द ओबामा यांची भाषणं ऐकून एक चांगला 'परफॉर्मन्स' पाहिल्याचं समाधान मिळालं, त्यापलीकडे काही नाही. याचा अर्थ मिशेल ओबामांनी सांगितलेले अनुभव खरे नाहीत असा नाही, पण त्याचा आणि निवडणुकीनंतर वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या राजकारणाचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. म्हणूनच रॉजर एबर्टसारखा नावाजलेला चित्रपट समीक्षकही 'भाषण ऐकून माझे डोळे पाणावले' असं म्हणतो तेव्हा आश्चर्य वाटतं. ओबामा चांगले बोलतातच, पण यावेळचं बिल क्लिंटन यांचं भाषण एक उत्तम वक्ता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण होतं. टेलेप्रॉम्टरची साथ असूनही त्यांनी भाषणात उत्स्फूर्तपणे टाकलेल्या वाक्यांमुळे भाषणाचं रूपांतर संवादात झालं. त्यांनी सोप्या शब्दांत, कोपरखळ्या मारत रिपब्लिकन पक्षाचे आरोप ज्या सफाईने खोडून काढले त्याला तोड नव्हती. क्लिंटन यांच्यावर अन्याय झाला असं मला नेहमी वाटतं. स्वतःच्या आयुष्यात मनाला येईल तसं वागणारा अमेरिकन माणूस राजकीय नेत्यांची खाजगी आयुष्यं धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ हवीत याबाबत आग्रही का असतो? म्हणूनच प्रत्येक उमेदवार बायको-मुलाबाळांसकट स्टेजवर येऊन आपलं कुटुंब किती आदर्श 'अमेरिकन फॅमिली' आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. अविवाहित उमेदवार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनू शकेल का? क्लिंटन यांना एका चुकीबद्दल महाभियोग आयोगापर्यंत जाण्याची वेळ आली. बुश यांनी वेळोवेळी, जाणूनबुजून, देशवासीयांची दिशाभूल केली, गरज नसताना देशाला युद्धात लोटलं, लाखो निरपराध आयुष्यं खर्ची घातली आणि याबद्दल त्यांची साधी चौकशीही करण्यात येऊ नये? ('छोटा छोटा मॅटर बने पुलिस केस, बडा बडा लफडा गुल विदाउट ट्रेस')

मला हल्ली अमेरिकेची निवडणूक म्हणजे चार वर्षांनी येणारा सुपरबाऊल असं वाटायला लागलं आहे. एकतर प्रत्येक गोष्टीतला अमेरिकन लोकांचा 'ऑस्सम' उत्साह पाहूनच आपला बघण्याचा उत्साह जातो. (हल्ली साइनफेल्ड बघतानाही कधीकधी असंच वाटत राहतं. त्यातला विनोद अजूनही आवडतो पण प्रत्येक वाक्य पाच कप कॉफी प्यायल्यासारखं बोलायला कसं काय जमतं? तुलनेनं ब्रिटिश सिटकॉम दुसरं टोक असल्या तरी बघताना विशेष त्रास होत नाही.) ओबामा परत निवडून येतील अशी आशा आहे. दुर्दैवाने तसं झालं नाही तर पुढची चार वर्षं निदान रॉमनी काय काय तारे तोडतो आहे हे बघून मनोरंजन तरी व्हावं. बुशनंतर अशा निखळ विनोदी वक्त्याची उणीव विशेष जाणवते आहे.

Bloggers

active bloggers in the last 24 hrs. Number shown in the bracket represents number of posts published in past 24 hrs,


other authors(109)

Fidarose Isha(3)

ravi dabas(3)

AMJAD KHAN(2)

Deepak(2)

MUNZ TDT(2)

Rakesh HP(2)

Raksha(2)

RWABhagidari.blogspot.com(2)

Sameena Prathap(2)

Srinivasan Sampathkumar(2)

The Guy in the Hat ™(2)

vskesavarao(2)

Aarthi(1)

Aathira Nair(1)

Abha Iyengar(1)

Abhishek Mukherjee(1)

Abraham Tharakan(1)

admin(1)

Always Happy(1)

Anil(1)

anouradha bakshi(1)

Anu Varma(1)

Archana Kumar(1)

Beyond(1)

Champa(1)

Chandrika Shubham(1)

churumuri(1)

churumuri(1)

CM(1)

dawdayogesh(1)

Debolina Raja Gupta(1)

Dimple Maheshwari(1)

Disha(1)

Dr.K.P.R.RAJA(1)

Garfield Dsouza(1)

Govind Kumar(1)

Harimohan(1)

Harini Padmanabhan(1)

harish p i(1)

Hemu(1)

iBeingMe(1)

Iti(1)

k(1)

Kalamwali Bai(1)

Krithi Karthi(1)

Kunal Singh(1)

Lluvia....(1)

Madhavi Madhurakavi(1)

mahima(1)

Meena(1)

Megha Sarin(1)

mêlée(1)

mervin anto(1)

Mohd Salim(1)

Mythreyi(1)

Nandana(1)

Neelam Dadhwal(1)

Neeraja(1)

NG(1)

Nisheeth Ranjan(1)

Nivedita Thadani(1)

Nivedita Thadani(1)

Nona(1)

Nupur(1)

palash ranjan khound(1)

Pari Vasisht(1)

parth joshi(1)

Pheno Menon(1)

pinksocks(1)

Pradeep Chakraborty(1)

Pranshu(1)

Prasanta Bora(1)

Preety(1)

Priyadarshi Mishra(1)

Raja(1)

rajkumar r(1)

Rams(1)

Ray Titus(1)

rhythmnguitars(1)

Ritesh Agarwal(1)

Ritu(1)

rm(1)

RNA Corp(1)

Sabina Fatima Hussain(1)

saketvaani(1)

Sameena Prathap(1)

Sampada(1)

Santhosh Sivarajan(1)

Saravanan Sivaraman(1)

sayedkhadri(1)

Shankha(1)

Shankha(1)

Shobha(1)

Shobhaa De(1)

sidhu352(1)

Smi..(1)

Sneha Sharma(1)

Sneo(1)

Sree(1)

Sriram Khé(1)

Sujoy Das(1)

Susan Deborah(1)

swapnil kochetaa(1)

Tarang Sinha(1)

Team G Square(1)

Umasree(1)

vanya(1)

Vidya Sury(1)

Vikram Karve(1)

vishesh unni raghunathan(1)


garland of Languages of India
an amalgamation of the diversified traditions
gracefully presented with novelty
http://www.haaram.com