स्टीव्ह जॉब्ज यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठात दिलेले भाषण आणि रोलिंगबाईंचे हार्वर्डमधील भाषण - दोन्ही आंतरजालावर बरीच गाजली. अशाच प्रकारचे
नील गेमन यांचे एक भाषण नुकतेच बघितले. गेमन ब्रिटीश लेखक आहेत. कॉमिक्सपासून ते लघुकथा, कादंबर्या, पटकथालेखन अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी बरेच लेखन केले आहे. 'अमेरिकन गॉड्स' ही त्यांच्या गाजलेल्या कादंबर्यांपैकी एक. गेमन आणि जॉब्ज यांच्या भाषणातील एक समान दुवा म्हणजे दोघांनीही आपले शिक्षण पूर्ण केले नाही. असे असूनही त्यांना पदवीदान समारंभात आमंत्रित केले जावे हा विरोधाभास आजच्या शैक्षणिक व्यवस्थेच्या संदर्भात मार्मिक वाटतो.