Skip Navigation Links



'चकली' ब्लॉगच्या वैदेही भावे यांची मुलाखत

Author : Raj      Blog :Random Thoughts      Date: 4/26/2012 5:35:00 AM


मागच्या वर्षी ब्लॉगविश्वाचा आढावा घेताना मराठी ब्लॉगांमधल्या 'चकली' या ब्लॉगचे वेगळेपण चटकन लक्षात आले. हा ब्लॉग अमेरिकेत राहणार्‍या वैदेही भावे यांचा आहे. नावावरून हा ब्लॉग पाकक्रियांचा आहे हे सहज लक्षात यावे. या ब्लॉगचे वैशिष्ट्य आहे याची लोकप्रियता. सदस्यत्व आणि वाचनसंख्या (Pageviews) या निकषांवर चकली मराठी ब्लॉगविश्वात पहिल्या क्रमांकावर आहे. अडीच ते तीन हजार नियमित सदस्य असलेल्या चकली ब्लॉगची वाचनसंख्या दरमहा १००,००० पेक्षा अधिक आहे.

तसं बघायला गेलं तर मराठी ब्लॉग धुडाळताना पाकक्रियेचे ब्लॉग सापडणं फारसं नाविन्यपूर्ण नाही. पण सातत्याने पाच वर्षे नवनवीन पाकक्रिया देऊन वाचकांचा विश्वास संपादन करणे फारच क्वचित बघायला मिळते. ब्लॉगजगतामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जो व्यावसायिक दृष्टीकोन दिसतो तो मराठी ब्लॉगविश्वात चकलीमध्ये बघायला मिळतो. 'Content is King' ही उक्ती ब्लॉगजगतामध्ये लोकप्रिय आहे आणि याची सत्यता चकलीमध्ये बघायला मिळते.

चकलीबद्दल वैदेही यांच्याशी काही गप्पा झाल्या. 

राज : 'चकली' ची सुरूवात कशी झाली?
वैदेही : चकली ब्लॉगची सुरुवात मे २००७ मध्ये झाली. मला विविध पदार्थ बनवायाला आणि खायला खूप आवडते. लग्नानंतर अमेरिकेत आले तेव्हा ब्लॉगिंग जगताशी ओळख झाली. मग हौस म्हणून नवनवीन पदार्थ बनवून ब्लॉगवर पोस्ट करू लागले. हळूहळू या आवडीचे रुपांतर पॅशनमध्ये झाले. आता चकली ब्लॉग आणि पाककला यातच करीयर करण्याचे मी ठरवले आहे.

राज : 'चकली' वर ६०० हून अधिक पाकक्रिया आहेत. इतक्या विविध प्रकारच्या पाकक्रिया कुठून मिळवता? त्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतात का?
वैदेही : माझ्या सासुबाई आणि आई दोघीही सुगरणी आहेत. त्यांच्याकडून बऱ्याच पाकक्रीयांची माहिती झाली. मी पाककृतींची पुस्तके,  कुकिंग चॅनेल्स तसेच इंटरनेटवर उपलब्ध माहितीची थोडीफार मदत घेते. त्यावरून करायला सोपे आणि बाजारात सहज मिळणाऱ्या गोष्टींचा जास्त वापर कसा करता येईल ते बघते. चकली ब्लॉगचे वाचकही त्यांच्या आवडीच्या रेसिपीजची फर्माइश करतात.

राज : मराठी ब्लॉगांवर जाहिरातींमार्फत उत्पन्न मिळवणे फारसे लोकप्रिय नाही. या बाबतीत तुमचा अनुभव कसा आहे?
वैदेही : चकली ब्लॉग हे मी माझे प्रोफेशन म्हणून पाहते. फक्त पाकक्रिया करतानाच नव्हे तर इतरवेळीसुद्धा मनात ब्लॉगविषयी विचार चालू असतो. ब्लॉगसाठी मी दिवसातला बराच वेळ देते. तसेच ब्लॉगवरील सर्व पाककृती वाचकांसाठी मोफत उपलब्ध आहेत.  आणि चकलीसाठी माझ्या बऱ्याच आयडियाज आहेत. त्या आयडीया प्रत्यक्षात आणण्यासाठी ब्लॉगमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची मदत होते.

राज : एकच पदार्थ दोघांनी केला तर त्याची चव हमखास वेगळी लागते. एखादीच्या किंवा एखाद्याच्या 'हाताला चव आहे' असं म्हटलं जातं. यामागे काय कारणे असू शकतात? स्वैपाकात शास्त्राचा भाग किती आणि कलेचा भाग किती?
वैदेही : पाककला ही शास्त्र आणि कला या दोन्हीचा समन्वय साधून तयार झालेली आहे. दोन निपुण व्यक्तींनी जर एखादी पाककृती जशीच्या तशी अनुकरीत केली आणि त्याचबरोबर साहित्यही सारख्या गुणवत्तेचे वापरले तर दोन्ही पदार्थ चवीला अगदी १००% नाही पण ९९% तरी सारखे लागतील. प्रत्येक व्यक्तीच्या सर्जनशीलतेतही फरक असतो जो पदार्थात उतरतो.

पदार्थ बनवताना बरेच लहान-सहान घटक असतात जे तेवढे लक्ष देण्यासारखे वाटत नाहीत पण खरं पाहायला गेलं तर फार महत्त्वाचे असतात. अगदी फोडणी करतानाही तेलात मोहोरी, हिंग, हळद हे पदार्थ घालताना तेलाचे तापमान आणि मधला काही सेकंदांचा कालावधीसुद्धा महत्त्वाचा असतो. पदार्थांसाठी वापरले जाणारे जिन्नस यांच्यामुळेही चवीत फरक पडतो. पाककृती बनवणे हा सरावाचाही भाग आहेच. उदा. पोळ्या, उकडीचे मोदक, पुरणपोळी हे सरावानेच जमते.

राज : स्नेपच्या पोशन्स क्लासमध्ये ज्यांना त्या कलेचं गुपित उमगलं आहे असे विशिष्ट विद्यार्थीच प्राविण्य मिळवतात. तसंच स्वैपाकात तरबेज असणं हे ही उपजत असतं की प्रयत्न केल्यावर साध्य होऊ शकतं?
वैदेही : स्वयंपाकात तरबेज असणं यासाठी प्रथम स्वयंपाकाची आवड असणे गरजेचे असते. कारण जेव्हा बारकाईने, लक्ष देऊन आणि मनापासून आपण पदार्थ बनवतो तो हमखास चांगला बनतो. स्वयंपाक ही इतर कलांसारखीच एक कला आहे. ज्यात काहीजणांना उपजतच आवड आणि ज्ञान असते. पण प्रयत्नांनी आणि सरावाने या कलेत प्राविण्य मिळवता येऊ शकते.

राज : सदस्यसंख्या आणि वाचनसंख्या या कसोट्यांवर 'चकली' हा मराठी ब्लॉगविश्वातील सर्वात लोकप्रिय ब्लॉग आहे. सदस्यसंख्या वाढण्यात एखाद्या विशिष्ट माध्यमाची किंवा घटकाची मदत झाली का? उदा. फेसबुक पेज केल्यानंतर सदस्यसंख्या वाढली असं लक्षात आलं का?
वैदेही : ब्लॉग चालवताना एक लक्षात येते कि लोकांना रेसिपीज मराठीतून वाचायला आवडते. मला खूप वाचकांनी सांगितले आहे कि रेसिपी वाचताना त्यांना जवळ आई किंवा आजी उभे राहून रेसिपी सांगतेय असे वाटते. साधी नेहमीच्या वापरातली भाषा आणि घरगुती पद्धतीने लिहिलेल्या रेसिपीज यामुळे आपोआप संख्या वाढते आहे. फेसबुक, ट्विटर अशा नवीन माध्यमांचा पण चांगला उपयोग होतो. फेसबुक वरून वाचक सहज रेसिपी शेअर करू शकतात.


राज : तुमचे पाच आवडते पदार्थ कोणते?
वैदेही : मला आवडणाऱ्या पदार्थांची यादी लिहायची झाली तर संपायची नाही. पण त्यातले अगदीच पाच निवडायचे झाले तर पुरणपोळी, उकडीचे मोदक, पावभाजी, बेसनाचे लाडू, आणि वडापाव हे पदार्थ मला फार आवडतात.

चकली फेसबुक आणि ट्विटरवरही आहे.

Bloggers

active bloggers in the last 24 hrs. Number shown in the bracket represents number of posts published in past 24 hrs,


other authors(37)

Vashi Chandiramani(9)

sankarshan(7)

Fidarose Isha(3)

Kartik Ramaswamy(3)

Manjit(3)

MUNZ TDT(3)

Ashwin Baindur(2)

Deepak(2)

Firoze Shakir Photographerno1(2)

Govind Kumar(2)

pixie(2)

R.D. Bhalekar(2)

Srinivasan Sampathkumar(2)

A, J and S(1)

aamjunta(1)

Abhishek Mukherjee(1)

aburman(1)

Amar Naik(1)

amarllyis(1)

Anubhav Sharma(1)

Aravind GJ(1)

Archana Kumar(1)

arkadev(1)

Aruna Manikandan(1)

AS(1)

aseemrastogi2(1)

Atanu Ghosal(1)

Balachandran V(1)

Bharathram Pattabiraman(1)

BUTTERFLIES OF TIME(1)

chandrashekhara(1)

churumuri(1)

cresloga(1)

Debolina Raja Gupta(1)

Deeps(1)

Dheeraj Pandey(1)

Dr Babu(1)

Garfield Dsouza(1)

Gauri(1)

Harimohan(1)

Himanshu Rai(1)

I for an Eye(1)

Ibrahim(1)

Indrani(1)

inquisitiveguurl(1)

IS(1)

Javin Paul(1)

Jean(1)

Jnanaswarupan(1)

K Praveen(1)

Ka Jo(1)

Kalyan P(1)

Kamal Sharma(1)

karanbhujbal(1)

Kichu Khonn(1)

Lakshmi Prabhala(1)

mad madrasi(1)

magiceye(1)

magiceye(1)

maglomaniac(1)

mahima(1)

mervin anto(1)

mk(1)

monikamanchanda(1)

Mridul Greenwold(1)

Naga(1)

Nanka(1)

Neelakantan Tn(1)

Neelam Dadhwal(1)

Nikhil Sheth(1)

nitya(1)

Nivedita Thadani(1)

PNA(1)

Prakash Jain(1)

Preety(1)

Premkumar Masilamani(1)

Priya Srinivasan(1)

Priyasha(1)

Pushkaraj Shirke(1)

Rajesh(1)

Raji(1)

Ram N(1)

Ram Shiv Murti Yadav(1)

Ramana Murthy Pallela(1)

Rams(1)

Raunak Baral(1)

Renu(1)

Ritu(1)

RNA Corp(1)

Sameena Prathap(1)

Sanjeev(1)

Sankara Subramanian(1)

Santhosh P(1)

Sasidhar Anne(1)

Shobha(1)

shoOOonya(1)

SJ(1)

SK(1)

Snehil(1)

Sue(1)

Sunil Jose(1)

Suravi Shome(1)

The knife(1)

udaya chandran(1)

Ugich Konitari(1)

Vasudev Ram(1)

Vidya lakshmi(1)

Vikram Karve(1)

Writer @ Serves-You-Write-Team(1)

Yashodhara(1)


garland of Languages of India
an amalgamation of the diversified traditions
gracefully presented with novelty
http://www.haaram.com