Skip Navigation Links



या नावांचं करायचं तरी काय?

Author : Raj      Blog :Random Thoughts      Date: 4/4/2012 10:23:00 AM


मणुक्शाच्या जीवणामध्ये भेडसावणारे बरेच प्रश्न आहेत. त्यातले बहुतेक प्रश्न घटोत्कचाच्या आकाराचे आहेत - बर्फ वितळतोय, प्रदूषण वाढतय, अमेरिका 'अकडम तिकडम तडतड बाजा' करत इराणमध्ये घुसायचं का नाही ते ठरवते आहे. या आणि अशा प्रश्नांवर बरीच मोठमोठी डोकी काम करत आहेत - आकारानेही मोठी आणि ताकदीनेही मोठी. तुलनेने आमच्या कमी ताकदीच्या डोक्यात त्या डोक्याच्या ताकदीला झेपतील असेच प्रश्न येतात. म्हणजे किमान आमच्या डोक्याला कोणते प्रश्न झेपतील हे कळण्याइतपत डोकं आम्हाला आहे. पण याचाच अर्थ असाही होतो की हे कळायला काही फार डोकं लागत नाही. हे प्रश्न म्हटलं तर किरकोळ असतात. त्यात कुणाच्याही जगण्यामरण्याचा प्रश्न वगैरे नसतो, मालमत्ताहानीही नसते. काही नतद्रष्ट याला 'भिंतीला तुंबड्या लावणे' असेही म्हणतात. हे प्रश्न म्हणजे काहीसे अशा प्रकारचे असतात - नवीन चप्पल घेतली आहे, घरी येईपर्यंत जाणवतं की थोडी काचते आहे पण इतकीही नाही की परत जाऊन बदलावी. होईल सैल म्हणून तुम्ही तशीच वापरता आणि हळूहळू त्या काचण्याचीच सवय होऊन जाते. किंवा कदाचित चप्पल सैलही होत असावी.

असाच एक प्रश्न आहे नावांचा. म्हणजे प्रश्न नावांचा नाही - नावांचा उच्चार करण्याचा आहे. आणि तो ही आपल्या नावांचा नाही तर परक्या नावांचा उच्चार करण्याचा. 'सॅचिन टेंडलकर' किंवा 'सनी गवास्कर'. आली का अडचण लक्षात? इथे गोम अशी आहे की फिर्यादी पक्ष आणि आरोपी पक्ष दोघांचीही बाजू पुरेशी भक्कम आहे. आरोपी पक्ष म्हणतो, "जगात इतक्या भाषा आहेत, त्यांचे नानाविध उच्चार, हरकती. कुठपर्यंत लक्षात ठेवायचं?" फिर्यादी पक्ष म्हणतो, "बॉयकॉट किंवा चॅपेलला कॉमेंट्री करताना दिवसातून एकदातरी तेंडुलकरचे नामस्मरण करावे लागत असेल. निदान जी नावे रोज वापरता ती तरी बरोबर म्हणा की." निवाडा करणे सोपे नाही. दोन्ही बाजूत तथ्य आहे. शिवाय हे ही तितकंच खरं की असे उच्चार ऐकताना ती भाषा बोलणार्‍या लोकांना 'अंगावर पाल, झुरळ किंवा तत्सम फायलममधील नको तो प्राणी पडणे' अशी अनुभूती होत असावी. म्हणजे या प्रश्नाला मानवाधिकाराचीही बाजू आहे.

एक मात्र आहे, ही तक्रार प्रत्येक भाषेतील लोकांची आहे. त्यातही अमेरिका सगळीकडेच पुढे असते म्हणून इथेही असावी. गेल्या शतकात अमेरिकेत इटालियन लोकांनी भरपूर प्रमाणात स्थलांतर केलं. 'मेल्टींग पॉट' संस्कृतीला अनुसरून त्यांची नावंही बदलली - मिकेलेचा मायकेल झाला, रोबेर्तो रॉबर्ट. इथपर्यंत ठीक होतं पण आडनावांचं काय? आडनावं तशीच राहिली पण इटालियन-अमेरिकन पिढीने त्यांचे उच्चार बदलले. उदा. Schiavo चा इटालियन उच्चार स्कियाव्हो आहे पण अमेरिकन लोक 'शायव्हो' म्हणतात. आंतरजालावर या प्रकाराबद्दल रागावलेले इटालियन पानंच्यापानं खरडत आहेत. तीच गत हिस्पॅनिक लोकांची.

इटलीमधील प्रमुख शहरांना दोन नावं आहेत. एक इटालियन आणि दुसरं इंग्लिश. रोम किंवा रोमा, फ्लोरेन्स किंवा फिरेंझे. पण काही शहरांना फक्त इटालियन नाव आहे - उदा कतांझारो, त्रेंतो. इथे अमेरिकन लोक हमखास त च्या जागी ट वापरतात आणि परत पालुसकुमार भेटतात. याच्या उलट म्हणजे मराठीत लिहीताना काही लोक 'इतालियन' असं लिहीतात. देशाचं नाव इटली आणि भाषा इतालियन - ये बात कुछ हजम नही हुई. हिंदीमध्ये इताली, इतालवी - सगळ्यासाठीच 'त' आहे. ज्या नावांचं इंग्रजीकरण झालेलं आहे तिथे ते वापरावं, पण मूळ इटालियन नाव असेल तर 'त' वापरणंच योग्य.

भारतीय नावांमध्ये गांधी आणि बुद्ध या नावांवर जे अत्याचार झाले त्याला तोड नाही. एकदा एका नावाजलेल्या अमेरिकन तत्वज्ञाचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. बुद्धाचे तत्वज्ञान, विचारसरणी त्याने उत्तम रीतीने समजावून सांगितली. त्याचा अभ्यास सखोल आहे हे उघड होते. मात्र प्रत्येक वेळी बुद्धाचे नाव घेताना त्याची जीभ काही वळायला तयार नव्हती. तासभर 'बूडा', 'बूडा' असं ऐकल्यावर दु:खाचं मूळ फक्त तृष्णा नाही तर उच्चारही आहेत असं वाटायला लागलं. मग मुक्ताबाई आठवल्या. ज्याच्यावर संशोधन करण्यात आयुष्य खर्ची घातलं त्याचं नावही नीट उच्चारता येऊ नये हे पाहून हा अमरू चांगदेवही कोराच राहीला की काय अशी शंका आली. गांधीचं तर स्पेलिंगही कित्येक लोक Ghandi असं का करतात देव जाणे आणि मग उच्चारही तसाच. 'गांधी' सिनेमात ही चूक दाखवलेली असूनही फारसा फरक पडलेला नाही.

हिंदी-उर्दू नावांची वेगळी अडचण आहे. मराठीप्रमाणेच हिंदीमध्ये 'ज' चे दोन उच्चार आहेत - जमीन आणि जायदाद. आणि काही लोक नेमका नको तिथे नको तो उच्चार वापरतात. गुलजारचं नाव उच्चारताना कुणी जादूमधला ज वापरला की जादू होऊन धरणी इथेच दुभंगावी आणि त्यात आपण नाही, तो उच्चार करणारा पडावा असं वाटायला लागतं. काही लोक यावर उपाय म्हणून मराठीत लिहीताना गुलझार किंवा गुलज़ार असं लिहीतात. पैकी पहिला पर्याय ठीक वाटतो फक्त झ चा उच्चार तीव्र व्हायला नको. दुसर्‍या पर्यायात अडचण अशी की मराठीत नुक्ता नाही. आणि आणायचा म्हटला तर 'रोग परवडला पण औषध नको' अशी अवस्था होईल कारण च, ज आणि झ चे प्रत्येकी दोन उच्चार आहेत. 'चिमणीने पिलाच्या चोचीत चिमणचारा चारला' - कुठेकुठे नुक्ता देत बसणार? शिवाय माझा-माझी, तुझा-तुझी आहेतच. एखाद्याला हे सगळं अनावश्यक वाटू शकेल पण हाच तर त्या-त्या भाषेचा लेहजा आहे. 'रेख्ते के एक तुम्ही उस्ताद नही हो ग़ालिब' म्हणताना योग्य जागांवर घसा योग्य तर्‍हेने वापरला गेला नाही तर मग शेर काय आणि किराण्याची यादी काय - सगळं सारखंच.

फ्रेंच उच्चारांशी बहुसंख्य लोकांचा परिचय नसतो. त्यामुळे त्या नावांचा उच्चार इंग्रजीसारखाच केला जातो. अर्धा जन्म फुरियर ट्रान्सफॉर्म वापरल्यानंतर त्याचं मूळ नाव फुरिए आहे हे कळलं. अजूनही शाळा-कॉलेजांमध्ये फुरियरच वापरतात. तीच गत फुकोची - Foucault चा फुकॉल्ट असा रोखठोक, तर्खडकरी उच्चार ऐकल्यावर फ्रेंच माणसाला हा जन्म फुका वाटला तर नवल नाही. ज्या प्रसिद्ध गावी सावरकरांनी बोटीतून उडी मारली त्या Marseille चा फ्रेंच उच्चार मार्से असा होतो. मार्सेलिस या उच्चाराचा उगम कुठून झाला असावा याबद्दल कुतूहल आहे.

एक विरुद्ध उदाहरणही आठवलं. काही वेळा काही नावांच्या उच्चारासाठी भाषेत शब्दच नसतात, म्हणजे हिंदीत 'ळ', 'ज्ञ' नाहीत तसं. याचं एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे चित्रकार Van Gogh. याचा उच्चार इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये व्हॅन गॉफ किंवा गॉघ असा केला जातो. पण मूळ डच उच्चार करायचा म्हटला तर ते केवळ अशक्य आहे. का ते इथे पहा. अशा वेळी अर्थातच इलाज नसतो.

इतक्या उदाहरणांनंतर शेवटी निर्णय कुणाच्या बाजूने? खरी गोष्ट अशी की अशा बाबतीत निर्णय वगैरे घेऊन काही होत नसतं. आणि निर्णय घेणारे आपण कोण? लोकांना त्यांच्या मर्जीप्रमाणे बोलण्याचं, लिहीण्याचं, वागण्याचं स्वातंत्र्य आहे. अमुक शब्द वापरा, अमुक शब्द वापरू नका, भाषा अशीच वापरा किंवा उच्चार असाच करा अशी सक्ती करता येत नाही आणि करता येऊही नये. तसं झालं तर ती 'पोलिस (की पुलिस?) स्टेटची' पहिली पायरी असेल. वैयक्तिक पातळीवर मला मूळ उच्चार शक्य तितक्या योग्य रीतीने करायला आवडतं. सुदैवाने आता फोर्वोसारख्या सायटी आल्यामुळे अवघड शब्दांचे उच्चार लगेच कळू शकतात.

पुणे विद्यापीठामध्ये पीएचडी करत असताना आमच्या लॅबमध्ये एकदा प्रा. वि. ग. भिडे आले होते. भिडे सरांचं बोलणं नेहेमी अत्यंत मुद्देसूद, एकही शब्द जास्त नाही की कमी नाही. बोलता-बोलता अशीच एक कल्पना निघाली. त्यावर प्रयोग करायचा तर एक क्रिस्टल हवा होता. ते म्हणाले एनपीएलमध्ये माझा मित्र आहे, त्याला पत्र पाठवू. तो लगेच पाठवून देईल. त्यांनी पत्र तोंडी सांगितलं, मी लिहून घेतलं. नंतर टाइप करून प्रिंटऔट काढला आणि त्यांना दाखवायला घेऊन गेलो. त्यांनी पहिली ओळ वाचली आणि म्हणाले, "रिमेंबर माय बॉय, द वर्स्ट वे टु इन्सल्ट अ पर्सन इज टु गेट हिज नेम रॉंग." ज्या शास्त्रज्ञांना पत्र लिहिलं होतं त्यांच्या नावात मी घोटाळा केला होता. चूक अर्थातच लगेच दुरूस्त केली.

तेव्हापासून कुणालाही पत्र लिहीताना नाव दोन-दोनदा तपासून बघायची जी सवय लागली ती आजही कायम आहे.

-------

१. मूळ इनोद हेराफेरी चित्रपटातून साभार. उठा ले रे बाबा - मेरेको नही रे, इन दोनोंको.

२. कोणत्याही भाषापंडिताच्या हातात (किंवा जिभेत) असतं तर हे दोन्ही उच्चार सारखे राहिले असते. भाषा लोकांनी बनवली याचा आणखीन एक पुरावा. असं का तर 'मेरी मर्जी'!

Bloggers

active bloggers in the last 24 hrs. Number shown in the bracket represents number of posts published in past 24 hrs,


other authors(63)

Vashi Chandiramani(9)

sankarshan(7)

Kartik Ramaswamy(4)

MUNZ TDT(4)

R.D. Bhalekar(3)

Sanjeev(3)

Deepak(2)

Fidarose Isha(2)

Firoze Shakir Photographerno1(2)

Gaurav B Gothi(2)

Govind Kumar(2)

Nikhil Sheth(2)

pixie(2)

Srinivasan Sampathkumar(2)

A, J and S(1)

Abhay Naxalrevolution(1)

Abhishek Mukherjee(1)

aburman(1)

Amar Naik(1)

amarllyis(1)

AMJAD KHAN(1)

anisnest(1)

Anubhav Sharma(1)

Aravind GJ(1)

Archana Kumar(1)

arkadev(1)

Aruna Manikandan(1)

AS(1)

aseemrastogi2(1)

Atanu Ghosal(1)

Bharat(1)

Bharathram Pattabiraman(1)

bhuji(1)

churumuri(1)

cresloga(1)

Curry Leaf(1)

Debolina Raja Gupta(1)

Deeps(1)

Dew(1)

Dhaval Mehta(1)

Dheeraj Pandey(1)

Dr Babu(1)

Gandharv(1)

Garfield Dsouza(1)

Gauri(1)

Harimohan(1)

Heena Jain(1)

Ibrahim(1)

Indrani(1)

inquisitiveguurl(1)

IS(1)

Iti(1)

Javin Paul(1)

Jean(1)

Jnanaswarupan(1)

Kalyan P(1)

Kamal Sharma(1)

karanbhujbal(1)

Kichu Khonn(1)

KParthasarathi(1)

Lakshmi Prabhala(1)

lijindev keloth(1)

mad madrasi(1)

magiceye(1)

maglomaniac(1)

mahima(1)

mervin anto(1)

monikamanchanda(1)

Mridul Greenwold(1)

Nanka(1)

Neelakantan Tn(1)

Neelam Dadhwal(1)

nina a.(1)

nitya(1)

Nivedita Thadani(1)

parth joshi(1)

Prahallad Panda(1)

Prakash Jain(1)

Preety(1)

Priya(1)

Priyasha(1)

Pushkaraj Shirke(1)

Raji(1)

Ram Shiv Murti Yadav(1)

Ram Surjit(1)

Ramana Murthy Pallela(1)

Renu(1)

RNA Corp(1)

S Vijaya Saradha(1)

Sakshi Garg(1)

Sameena Prathap(1)

Sankara Subramanian(1)

Sasidhar Anne(1)

Shobha(1)

Shreya(1)

SJ(1)

Sorcerer(1)

Spiritual Sherpa(1)

Srikanth(1)

Sriram Khé(1)

Sunil Jose(1)

Suravi Shome(1)

Tanushree(1)

Tarang Sinha(1)

udaya chandran(1)

Ugich Konitari(1)

Vidya lakshmi(1)

Vikram Karve(1)

Yashodhara(1)

Yogesh(1)


garland of Languages of India
an amalgamation of the diversified traditions
gracefully presented with novelty
http://www.haaram.com