Skip Navigation Links



लेना होगा जनम तुम कई कई बार.....

Author : भोवरा      Blog :भोवरा      Date: 04-12-2011 17:44:00


लेना होगा जनम तुम कई कई बार.....
one and only .....Dev Anand

एवर-ग्रीन देवानंदला आपल्याकडे बोलावून देवाला पण आनंद झाला असेल.
केसाचा कोंबडा पडून वेगळीच स्टाईल करणारा देवानंद
गाईड मधला राजू आणि नंतर झालेला स्वामी,
ज्वेलथीफ मधला देवानंद,
हिरापन्ना मधला फोटोग्राफर,
दम मारो दम गाणे चालू असताना बहिणीला शोधात असणारा भाऊ,
फुलों का तारों का सबका केहना है गात बहिणीची समजूत काढणारा भाऊ,
चुडी नाही है मेरा दिल है .....म्हणत मान डोलवत गाणे म्हणणारा प्रियकर
दिल आज शायर है...गम आज नगमा है म्हणत मोठ्या मिश्या लावलेला देवानंद
मेरा मन तेरा प्यासा म्हणत आरशात बघत गाणे म्हणणारा देवानंद
शोखीयोन मे घोला जाये म्हणत नशीली चाल चालणारा देवानंद
दिल का भंवर करे पुकार  म्हणत नूतन च्या मागे मागे फिरत पायऱ्या उतरणारा देवानंद
अच्छा जी मै हारी चलो मान जावोना  म्हणणाऱ्या मधुबालावर वर रागावणारा देवानंद
ये दिल ना होता बेचारा  म्हणत गाडीच्या पुढे आपल्या खास चालीत चालणारा देवानंद

अरे कितीतरी आठवणी मागे ठेवून गेला आहेस. तू दिलेले चित्रपट, तू अभिनय केलेली गाणी, कोणी कितीही बोलो आणि कितीही अपयश येऊन ही तू दिग्दर्शित आणि निर्मिती केलेले चित्रपट...कितीतरी अनमोल ठेवा तू मागे ठेवून गेला आहेस.
एकाच गोष्ट तू कधी केली नाहीस ती म्हणजे पडद्यावर कधी रडला नाहीस. जेव्हा कधी रडायचा सीन आलास की  हाताच्या ओंजळीत तू आपले तोंड लपवून घ्यायचास किंवा कॅमेरा कडे पाठ तरी फिरावायचास. रडणे कधी तुला जमलेच नाही. म्हणूनच तुला नेहमी हसतमुख चेहऱ्याचा एवर-ग्रीन कलाकार म्हणत असावे.

तुझ्या यशस्वी कारकिर्दी कडे पाहत आणि भारतीय सिनेमासाठीचे तुझे योगदान पाहून एवढेच म्हणावेसे वाटते

 अभी ना जावो छोडकर के दिल अभी भरा नाही 
अभी तो कुछ कहा नहीं
अभी तो कुछ सुना नहीं
अभी न जावो छोड़ कर
के दिल अभी भरा नहीं....

भोवरा ह्या सदाबहार कलाकाराला सलाम करतो.


garland of Languages of India
an amalgamation of the diversified traditions
gracefully presented with novelty
http://www.haaram.com